‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी निघाले

‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी निघाले

मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलीवूडपर्यंत सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘ठाकरे’ या चित्रपटाची. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे आज स्क्रीनिंग होते. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे देखील आले होते. मात्र ते चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून तडकाफडकी निघाल्याची घटना घडली आहे.

जागा न मिळाल्याने पानसे तडकाफडकी निघाले

‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून दिग्दर्शक अभिजित पानसे आपल्या कुटुंबियांसह गेले होते. मात्र त्यांना जागा न मिळाल्याने अभिजित पानसे हे तडकाफडी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते नाराज होऊन निघाल्याने निर्माते संजय राऊत यांनी पानसे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला.

‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांना एक महत्त्वाचे काम आल्या कारणांने ते चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून उठून गेले. तसेच ते जाताना मला भेटून देखील गेले.   – संजय राऊत, ‘ठाकरे’ चित्रपटाचे निर्माते

First Published on: January 23, 2019 9:04 PM
Exit mobile version