ठाकरे कुटुंबाचे कार प्रेम,उद्धव यांना मर्सिडीज बेन्ज तर राज यांना लँड क्रुझर आहे प्रिय

ठाकरे कुटुंबाचे कार प्रेम,उद्धव यांना मर्सिडीज बेन्ज तर राज यांना लँड क्रुझर आहे प्रिय

नाशिक दौऱ्यावर गेलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लँड रोवर गाडी स्वत: चालवत ड्रायव्हिंगचा आनंद घेतला. सध्या या गाडीची जोरदार चर्चा असून त्यानिमित्ताने ठाकरे कुटुंबाच कार वरील प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जरी सध्या राज्याची धुरा सांभाळत असले तर त्यांचा खरा रस हा फोटोग्राफी आहे हे जगजाहीर आहे. पण त्याव्यतिरिक्त उ्दधव ठाकरेही कारचे शौकिन आहेत. आलिशान, महागड्या गाड्यांचे प्रत्येकाचे वेगळं कलेक्शन आहे. उद्धव यांच्याकडे Mercedes-Benz GL-Class ही महागडी कार असून बऱ्याचवेळा मुख्यमंत्री स्वत:च ड्रायव्हिंग करत असल्याचे मुंबईकरांना बघायला मिळतं. उ्ध्वव य़ांच्याकडे मर्सिडीज बेन्ज जीएल क्लास या कार व्यतिरिक्त टोयोटा फॉर्च्युनर, टाटा सफारी आर्मर्ड या गाड्या त्यांच्या ताफ्यात दिसतात.

सध्या जरी उ्धव आणि राज ठाकरे फारसे एकत्र दिसत नसले तरी याआधी बऱ्याचवेळा याच गाडीतून एकत्र फिरायचे.

राज ठाकरे यांनाही वेगवेगळ्या कंपनीच्या कारचे कलेक्शन करण्याबरोबरच ती ड्राईव्ह करण्याचा शौक आहे. त्यांच्याकडे Mercedes-Benz S-Class ही आलिशान कार आहे. ही कार ते स्वत:च ड्राईव्ह करताना दिसतात. टोयोटा लँड क्रुझर ही थोड्या जुन्या जनरेशनची कारही राज यांच्याकडे आहे. बुलेटप्रुफ असलेली ही कार मजबूत तर असतेच पण तिचा किलर लुकही तिची श्रीमंती दाखवतो. यामुळे सेलिब्रिटीजची फेवरेट कार म्हणून या गाडीला ओळखले जाते.

वडील आणि काकांप्रमाणेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही महागड्या गाड्यांचा शौक आहे. आदित्य यांच्याकडे BMW 5GT बीएमडब्ल्यु कार आहे. आदित्य बऱ्याचवेळा याच कारचा वापर करताना दिसतात. निवडणूकीच्या वेळीदेखील याच कारमधून त्यांनी प्रचार केला होता. आरामदाय़ी प्रवास आणि एैसपैस जागा ही या कारची वैशिष्ट्य आहेत. कुटुंबाबरोबरच मित्रांबरोबर लॉंग ड्राईव्हसाठी बीएमडब्ल्यू ५ जीटी एकदम परफेक्ट आहे. आदित्य यांच्याकडे लँड रोवर कार आहे. धनाढ्य, प्रसिद्ध सेलिब्रिटीजमध्ये या कारचे क्रेझ आहे. यामुळे आदित्य यांच्याकडे ही कार असणं स्वाभाविक आहे. आदित्यला निळा रंग आवडत असल्याने त्यांच्या कारचा रंगही निळा आहे.

 

First Published on: September 23, 2021 3:56 PM
Exit mobile version