Breaking : भिंवडीत १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त

Breaking : भिंवडीत १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त

भिवंडीमध्ये जिलेटीनच्या हजारो कांड्या बेकायदेशीररीत्या साठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने भिवंडीत एक मोठो सर्च ऑपरेशन करत ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास १२ हजार जिलेटीनच्या कांड्या हस्तगत करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात कारवली याठिकाणी मित्तर एंटरप्राईजमध्ये ही कारवाई ठाणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदेशीररीत्या जिलेटीन आणि डेटोनेटरचा साठा केल्याचे आढळले आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न ठेवता या जिलेटीनच्या कांड्या ऑफिसच्या स्टोअररूममध्ये बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्या होत्या.

डेक्कन कंपनीचे १२ हजार जिलेटीन कांड्या आणि ३००८ सोलर तसेच डेक्कन कंपनीचे डेटोनेटरही हस्तगत करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या कारवली या ठिकाणी असलेल्या मित्तल एंटरप्राइजेस च्या कार्यलायत ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष १ मार्फत छापा टाकण्यात आला. या छाप्यात गुरुनाथ म्हात्रे (५३) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गुरूनाथ म्हात्रेला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. त्याला स्थानिक न्यायालयाने 22 मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. बेकायदेशीर जिलेटीन कांड्या आणि डेटोनेटरचा साठा कुठल्याही सुरक्षित स्थळी न ठेवल्या प्रकरणी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपुर्ण स्फोटकांचा साठा हा एका कपाटात ठेवण्यात आला होता असे छापा टाकणाऱ्या टीमला आढळले होते. या आरोपीचा खाणकामाचा व्यवसाय असून, त्याने हा साठा बेकायदेशीर पणे खोदरामासाठी ठेवला होता होता असे तपासाता निष्पन्न झाले आहे. या कारवाईत एकुण ६० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये १९० इतक्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. ठाणे पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही मोहीम पार पाडली आहे. स्फोटके साठवल्या प्रकरणी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यासाठी सेफ हाऊस असणे गरजेचे असते. मात्र या खाणकाम व्यावसायिकाने कुठल्याही प्रकारे सुरक्षिततेची काळजी न घेताच हा सगळा स्फोटकांचा साठा हा कार्यालायच्या स्टोअर रूम एका कपाटात ठेवला होता. या बेकायदेशीर साठ्यामुळे मोठी दुर्घटना होऊन अनेकांचे प्राण त्यात गेले असते. त्यामुळेच अशा साठवणुकीविरोधात ही मोहीम राबवत कारवाई करण्यात आली. अशा अनधिकृत साठ्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा कक्ष १ चे स पो नि प्रफुल्ल जाधव यांनी पथकासह सोमवारी रात्री केली आहे.

First Published on: May 18, 2021 4:03 PM
Exit mobile version