कर वसुलीत ठाणे महापालिका अव्वल

कर वसुलीत ठाणे महापालिका अव्वल

ठाणे महापालिका

निवडणूक कामात कर्मचारी आणि अधिकारी व्यस्त असूनही दैनंदिन कामात कोणताही कसुर न दाखविणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने राज्यात सर्वाधिक कर वसुल करून विक्रम केला आहे. यंदा महापालिकेने एकुण उद्दिष्टाच्या ९१.९६ टक्के करवसुली केली आहे. यंदा महापालिकेपुढे २५८८ कोटी २८ लाख रूपयांचे उत्पन्न वसुल करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी दोन हजार ३८० कोटी १९ लाख रूपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. शासनाकडून जीएसटीपोटी ७२० कोटींचे अनुदान आणि १८२ कोटी ४८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटीचे उत्पन्न जमा झाले आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या तिजोरीत २२५७ कोटी ८३ लाख इतके उत्पन्न जमा झाले होते. यंदा त्यापेक्षा १२२ कोटी ३६ लाख रूपये अधिक उत्पन्न मिळाले आहे.

ठाणे महापालिकांना असा मिळाला कर?

मालमत्ता करातून ४६८ कोटी तर स्थानिक संस्था करापोटी २९ कोटी ४५ लाख रूपये उत्पन्न वसुल करण्यात आले आहे. शहर विकास विभागाकडून सर्वाधिक तब्बल ६२८ कोटी ५६ लाख, पाणीपट्टी विभागाकडून १२० कोटी ९५ लाख, जाहिरात विभाग १५ कोटी ७४ लाख, अग्निशमन दल शुल्क ७४ कोटी ९० लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग ३२ कोटी २८ लाख, स्थावर मालमत्ता विभाग १६ कोटी ६३ लाख, घनकचरा व्यवस्थापन विभाग एक कोटी ८३ लाख, नाट्यगृहातून २ कोटी ४३ लाख, तरण तलाव विभाग १ कोटी ५४ लाख, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून ५ कोटी २ लाख, राजीव गांधी वैद्याकीय महाविद्याालयातून ६ कोटी 70 लाख, परवाना विभागातून २ कोटी ३६ लाख आदी विभागांचे मिळून ठामपाच्या तिजोरीत १४५८ कोटी २३ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.

First Published on: April 19, 2019 5:41 PM
Exit mobile version