मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने जे आदेश काढले आहेत त्याची कठोर अंलबजावणी करावी. नागरीकांमध्ये जनजागृती करावी या निर्बंधांना नागरीकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेण्याच्या सूचना देतांनाच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा सूचक इशारा या बैठकीदरम्यान दिला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज नंदुरबार जिल्हयाच्या दौर्‍यावर आले असता ओझर विमानतळ येथे त्यांनी अधिकार्‍यांसमवेत चर्चा करत जिल्हयाची कोरोना परिस्थिती, राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी लसीकरण वाढविण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सर्व निर्बंधांना नागरीकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे बघून पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी देत एकप्रकारे लॉकडाऊनचा सूचक इशाराच यावेळी दिला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे उपस्थित होते.

First Published on: March 19, 2021 7:26 PM
Exit mobile version