Coronavirus : कोपरगावच्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेची झुंज अखेर संपली!

Coronavirus : कोपरगावच्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेची झुंज अखेर संपली!

कोरोना व्हायरस

कोपरगावच्या लक्ष्मीनगरमधील ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. या कोरोनाबाधित महिलेची मृत्युशी सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. दरम्यान, या महिलेमुळे नगर जिल्ह्यातील मृतांची संख्या दोन झाली असून याआधी श्रीरामपुरातील एकाचा आधी मृत्यू झाला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.

या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याने नगरमध्ये झालेला हा पहिलाच मृत्यु आहे. मात्र, यापुर्वी जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील कोरोनाबाधित तरुणाचा उपचारादरम्यान पुण्याच्या ससूनमध्ये मृत्यू झाला होता. महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता अधिक वाढली आहे. सुदैवाने या महिलेच्या संपर्कातील चाैदा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नुकताच सोमवारीदेखील नेवासेमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८वर गेली होती. दरम्यान महिलेच्या मृत्यूमुळे कोपरगावमध्ये अधिक सतर्कता प्रशासन बाळगत आहे.

शुक्रवारी या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तत्पुर्वी या महिलेवर कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात न्युमोनियाचे उपचार सुरु होते. त्यानंतर या महिलेला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला बुथ रुग्णालयातमध्ये हलविण्यात आले. मात्र, प्रकृती असवस्थेमुळे तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करुन तेथे तिच्यावर उपचार सुरु असताना पहाटे मृत्यू झाल्याचे समोर आले.

First Published on: April 14, 2020 12:43 PM
Exit mobile version