राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम; मुंबई, ठाणेसह पालघरमध्ये पावसाची शक्यता

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम; मुंबई, ठाणेसह पालघरमध्ये पावसाची शक्यता

मुंबई | राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिलह्ययात आज पावसाचा इशारा हवामान विभागाने (indian meteorological department) दिला आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबई, ठाण्यात प्रचंड उकाडा वाढला होता. यानंतर आता मुंबई, ठाणेसह पालघरमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागने दिला आहे.

मुंबई आणि पालघर येथील काही भागात आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई आणि ठाणे येथे गुरुवारी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसात पाऊस नाही. तर मुंबईत मंगळवारी सांताक्रूझमध्ये ३३ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३३. २ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. परंतु, मुंबईकरांनी वातावरणात आर्द्रता असल्याने तापमानाच्या तुलनेत अधिक उकाडा अनुभवला आहे.

दरम्यान, उत्तर, मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथे शनिवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथे आज आणि उद्या हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट दिल आहे. यानंतर पुणे आणि अहमदनगर येथे पाऊस होण्याची शक्यता आहे तर, या व्यतिरिक्त सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथेही आज ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यात बुधवारी आणि गुरुवारी गारपिटीची होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे

रांची ते मदुराईपर्यंत वारा खंडितता प्रणाली टिकून आहे. मान्सून पूर्व काळामध्ये सर्वसाधारण वारा खंडितता प्रणाली अपेक्षित असेत. परंतु, यंदा ८ मार्चपासून वारा खंडितता प्रणाली आढलेली नाही. पूर्वी किनारपट्टीला समांतर भूभागावर झारखंड ते दक्षिण चेन्नईपर्यंत असतो. यंदा ही प्रणाली दक्षिणोत्तर स्थितीत उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण चेन्नईपर्यंत दोलायनात फिरत राहिली. यामुळे दक्षिण द्वीपकल्प भागातील हवेचे उच्च दाब क्षेत्र समुद्राच्या दोन्ही बाजूला टिकून राहिले तर जमिनीवर वारा खंडितता प्रणालीमुळे सतत अवकाळी पावसाचे वातारवण राहिले आहे, अशी माहिती खुळेंनी दिली आहे.

First Published on: April 26, 2023 10:21 AM
Exit mobile version