Coronavirus : वांद्रे-कुर्ला परिसरातील नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणात कमालीची घट

Coronavirus : वांद्रे-कुर्ला परिसरातील नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणात कमालीची घट

World Health Day 2022 : जगातील 99 टक्के लोकसंख्या विषारी हवेने घेताय श्वास; WHO चा रिसर्च

मुंबई आणि मुंबई जवळच्या परिसरातील प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे नेहमी दिसून येते. परंतु , कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईच्या हवा गुणवत्तेच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी वातावरण संस्थेने सिपिसिबीच्या संकेत स्थळावरील आकडेवारीचा उपयोग केला आहे. हे विश्लेषण दर्शवते की, माननीय पंतप्रधानांच्या २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता करण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या अधिकृत घोषणे अगोदरच मुंबई शहर हे राज्याने घोषित केलेल्या लॉकडाऊनचे(राज्य-व्यापी बंद) पालन करत होते. याचाच परिणाम म्हणून मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळीमध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे.

१७ मार्च ते १ एप्रिल २०२० या कालावधीतील आकडेवारीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे.

– नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) च्या प्रमाणात ८७% घट झाली.
– पीएम २.५ च्या प्रमाणात ७२% घट झाली.
– पीएम १० च्या प्रमाणात ६८.९% घट झाली.
– कार्बन मोनोऑक्साइड(CO) च्या प्रमाणात ७४% घट झाली.
– नायट्रोजन मोनोऑक्साइड(NOx) च्या प्रमाणात ८८.३९.% इतकी घट झाल्याचे या विश्लेषणात आढळून आले आहे.

First Published on: April 5, 2020 10:47 AM
Exit mobile version