चर्चा तर होणारच

चर्चा तर होणारच

विधानसभा निवडणुकांमध्ये गाजलेल्या काही मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कोथरूड मतदारसंघ. भाजपाने विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारत चंद्रकांत पाटील यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर अनेकांनी स्थानिक उमेदवार हवा असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना विरोध केला होता. परंतु कालांतराने सर्वांना विरोध कमी करण्यात पाटील यांना यश आले. त्यांच्यासमोर मनसेच्या किशोर शिंदेंचे आव्हान होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या ठिकाणी सभा घेत चंद्रकांत पाटलांचा चंपा म्हणत समाचार घेतला होता. या निवडणुकीत किशोर शिंदे यांचा पराभव झाला. परंतु, पराभवानंतरही या ठिकाणी किशोर शिंदे यांचीच चर्चा असल्याचे पहायला मिळत आहे. कारण किशोर शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान केलेला खर्च चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदे यांनी या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षाही अधिक खर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे.

मनसेच्या किशोर शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान तब्बल ९ लाख २७ हजार ७२७ रूपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीदरम्यान ६ लाख ५७ हजार २८९ रूपयांचा खर्च केला. किशोर शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांपेक्षा जवळपास तीन लाख रूपयांचा अधिक खर्च केला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या खर्चाच्या माहितीतून ही माहिती समोर आली आहे.

तर मनसेच्या किशोर शिंदेंनी सभा आणि अन्य कार्यक्रमांसाठी तब्बल ९ लाख २७ हजार ७२७ रूपयांचा खर्च केला आहे.तर चंद्रकांत पाटील यांच्या सभा आणि रॅलींवर १ लाख ८ हजार १५४ रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. सभेच्या मंचासाठी ४८ हजार रूपये, खुर्च्यांसाठी १६ हजार रूपये तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी १८ हजार, टी-शर्टसाठी २३ हजार आणि सोशल मीडियासाठी १९ हजार ५८९ रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

First Published on: November 1, 2019 5:32 AM
Exit mobile version