शपथविधीला महिलांचा जल्लोष

शपथविधीला महिलांचा जल्लोष

 कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, ही ताकद कुणाची… शिवसेनेची अशा घोषणांनी गुरुवारी शिवाजी पार्क दुमदुमले. शिवतीर्थावर भरलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेकांचे डोळे एलईडी स्क्रीनकडे लागले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे नाव पुकारल्यावर एकच घोषणाबाजी होत एक मोठा जल्लोष झाला.

राज्यातल्या संकटातल्या शेतकर्‍यांना तत्काळ न्याय द्यावा, अशी एक जनमाणसातली भावना महाराष्ट्र विकास आघाडीच्या शपथविधीसाठी हजर असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात होती. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क गजबजून गेले होते. तीन वेगवेगळ्या पक्षांच्या विचारांचे वेगवेगळे कार्यकर्ते याठिकाणी आले होते, पण एक चांगला शिस्तबद्ध असा संदेश कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे दिला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना पाहून अतिशय आनंद झाला आहे, असे दादर परिसरात दुकान चालवणार्या रोहिणी पनवेल कर यांनी सांगितले. येत्या काळात एक.

महिलांच्या हितासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शपथविधीचा महासोहळा घडतोय त्यासाठी शरद पवार यांच खंबीर नेतृत्व कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आदिल पानसरे यांनी दिली. शिवसेनेचे हिंदुत्व वेगळ आहे, म्हणून या सरकारकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर ते नक्कीच न्याय देतील असेही त्यांनी सांगितले.

First Published on: November 29, 2019 6:43 AM
Exit mobile version