CoronaVirus: पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

CoronaVirus: पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

कोरोना व्हायरसचा कहर देशभरात सुरू असून त्यावर लस शोधण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहे. अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपीने कोरोना रूग्णावर उपचार केल्यास तो कोरोनामुक्त होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. याचाच प्रत्यय पुण्यातील ससून रुग्णालयात आला. या रुग्णालयातील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून राज्यातील शासकीय रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच घटना आहे.

या कोरोनाबाधित रूग्णावर प्लाझ्मा थेरपी करून तो कोरोनामुक्त झाला. पंधराव्या दिवशी २ RTPCR चे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णास कोव्हिड वार्डमधून हलविण्यात आले आहे. या रुग्णाला उच्च रक्तदाब, हायपोथाराईडीझम व अतिस्थूलपणा हे आजार देखील होते. दरम्यान, ससून रुग्णालयातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले की, कोरोनाच्या आजारात अशा रुग्णांमध्ये जास्त गुंतागुंत होऊन बऱ्याचदा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. परंतु, या व्यक्तीला वेळीच दोन दिवस १० आणि ११ मे रोजी प्लाझ्मा २०० एमएल प्रतिदिन) दिल्याने रुग्णाची प्रकृती सुधारली असून लवकरच या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

प्लाझ्मा देण्याची प्रक्रिया यशस्वी

नायडू रुग्णालयात ६ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर या रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा रक्तातील १ घटक ससून रुग्णालयात दान देऊन गंभीर रुग्णाचा प्राण वाचवला आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर १ महिन्यात त्याच्या रक्तामध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. ससून रुग्णालयात प्लाझ्मा देण्याची प्रक्रिया मागील आठवड्यात यशस्वीरित्या पार पडली.


Coronavirus: मुंबईत ‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या रुग्णाचा मृत्यू
First Published on: May 22, 2020 8:33 AM
Exit mobile version