युरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा पण…, मणिपूरवरून संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

युरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा पण…, मणिपूरवरून संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई | मणिपूरच्या विषयावर युरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या पार्लमेंटमध्ये चर्चा करून देत नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मागील अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मणिपूरमध्ये हजारहून अधिक लोकांच्या जमावाने दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या मुद्यावरून संजय राऊत यांनी आज पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.

संजय राऊत मणिपूरवर बोलताना म्हणाले, “मणिपूरच्या विषयावर युरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या पार्लमेंटला चर्चा करून देत नसतील तर ही देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.” केंद्र सरकारला मणिपूरमधील दंगली रोखण्यात अपयश येत आहे का? पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “70 दिवस होऊन देखील  केंद्र सरकारला मणिपूर शांत करता येत नाहीत आणि जगाचे प्रश्न सोडवित आहेत, असा टोला लगावला. “आधी मणिपूर शांत करा. मणिपूर हा देशाचा भाग असून येथील जनता देखील देशाचा भाग आहे. मणिपूरच्या महिलांना नग्न निवस्त्र करून मागले जात आहेत. हे देशाच्या जनतेसाठी चिंतेची गोष्टी आहे. केंद्र सरकार समान नागरिक कायदा आणत आहेत. आधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था नीट करा.”

पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ

पंतप्रधान मंत्र्यांच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा राजकीय स्वार्थ असतो आणि भाजप देखील स्वर्थाशिवाय काही करत नाहीत. येणारा काळच पंतप्रधानांचा राजकीय स्वर्थ ठरवेल, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. मुंबईतील सर्वच कोव्हिड सेंटरने उत्तम काम केले आहे. सर्वांनी पेंडेमिक एक्टनुसार सर्वांनी काम केले आहे. कोव्हिड काळात चांगले काम केल्याचा फायदा आगामी पालिका निवडणुकीत मिळेल. यामुळेच भाजपने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपवर केला आहे.

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील

अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने वर्षानिवासस्थानी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले, पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “अजित पवार हे भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच होतील. राज्यातील सध्याचे राजकारण पाहाता ते फार भावी देखील राहणार नाही. अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील. शिंदे गटान हे सत्य स्वीकारले पाहिजे.

 

First Published on: July 21, 2023 10:44 AM
Exit mobile version