पदोन्नतीतील आरक्षणाबाबत लवकरच तोडगा निघेल – नितीन राऊत

पदोन्नतीतील आरक्षणाबाबत लवकरच तोडगा निघेल – नितीन राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पदोन्नती आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे आमदार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देताना पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत लवकरच तोडगा निघेल, असं सांगितलं. आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच यावर तोडगा निघेल. याशिवाय, पदोन्नतीत आरक्षण मिळालं पाहिजे या माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असं राऊत म्हणाले.

“पदोन्नती आरक्षण या विषयी बैठकीत सकारात्मक सांगोपांग चर्चा झाली आहे आणि निश्चितच यावर तोडगा निघेल, अशी मला खात्री आहे. सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे. सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे आता काही अडचण येणार नाही. लवकरच यावर तोडगा काढला जाईल,” असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

यावेळी नितीन राऊत यांनी ७ मे रोजी काढण्यात आलेल्या शासनाच्या आदेशासंदर्भात माहिती दिली. “७ मे रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबतच चर्चा झाली असून सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, त्यावर सर्वांनी अभ्यास करायचं ठरवलं आहे. कायदेशीरबाबी अनेक आहेत. प्रशासकीय बाबी आहेत. सकारात्मक निर्णय होईल, असं सर्वांनी मत व्यक्त केलं आहे,” असं राऊत यांनी सांगितलं.

 

First Published on: June 1, 2021 1:38 PM
Exit mobile version