मुळा धरणावरील यांत्रिक बोटीचा प्रवास सुरू

मुळा धरणावरील यांत्रिक बोटीचा प्रवास सुरू

The journey of the mechanical boat on the Mula dam begins

जगभरात उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे जनजीवना सोबतच उद्योगधंदे ठप्प झाले होते. याचा फटका राहुरीच्या मुळा धरणावरील यांत्रिक बोटीलादेखील बसला होता. सरपंच रामदास बाचकर ग्रामसेवक बाचकर भाऊसाहेब यांच्या परवानगीने शनिवारी ही यांत्रिक बोट सुरू झाली आहे.
मुळा धरणाच्या पैलतिरी असलेल्या वावरथ, जांभळी, जांभूळबन आदी दुर्गम भागातील जनजीवन या बोटीच्या प्रवासावर अवलंबून असते. बोटीच्या प्रवासाशिवाय येथील नागरिकांना शहराशी संपर्क साधता येत नाही धरणातून दुसर्‍या टोकावर असलेल्या या गावांमध्ये जाण्यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याने या परिसरातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून बोटीचा प्रवास सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळा नदीवर पूल बांधण्याचा प्रश्न प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविण्यात आला होता. निवडणुका संपल्या आणि या पुलाचा प्रश्नही तसाच पुन्हा अडगळीत पडला. ज्यांनी-ज्यांनी पुलाची मागणी केली, त्यांची अवस्था नंतरच्या काळात ‘ढूंडते रह जाओगे’ अशी झाली.
लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या बोटीचा प्रवास नगर जिल्हा नोन रेड झोन मध्ये गेल्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी तेव्हा दहा प्रवाशांना बोटीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. प्रत्येक प्रवाशाला तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच सुरक्षित अंतर नियमाचेदेखील काटेकोरपणे पहिल्या दिवशी पालन करण्यात आले.

शासनाच्या आदेशाचे पालन

टाळेबंदीच्या काळात शासनाच्या आदेशाचे पालन करत बोट बंद ठेवण्यात आली होती. रुग्णालयात जाण्यासारखे अत्यावश्यक काम असेल तरच बोटीने प्रवास करण्याची परवानगी दिली जात होती.
– रामदास बाचकर, सरपंच
First Published on: May 22, 2020 11:06 PM
Exit mobile version