Coronavirus : लहानग्यांनी दिला कोरोनाशी लढण्याचा संदेश, व्हिडीओ व्हायरल

Coronavirus : लहानग्यांनी दिला कोरोनाशी लढण्याचा संदेश, व्हिडीओ व्हायरल

कोरोना व्हायरसने जगभरात दहशत पसरविली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये हा विषाणू असा काही फोफावला, की पाहता पाहता जगभरासह भारतातही पसरला. मुख्य म्हणजे कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारने काही कठोर पावलं उचलली. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची हाक दिली. कोरोना विषाणूची लागण होण्याची साखळी तोडण्यासाठीचे हे काही प्रतिबंधात्मक उपाय. पंतप्रधानांनी दिलेली ही हाक अनेकांनी गांभीर्याने घेतली. पण काहीजण याला अपवाद ही ठरले. लॉकडाऊनमुळे कोरोना बधितांची संख्या आटोक्यात आणण्यात आता भारताला यश आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

परिस्थितीविषयी अद्यापही गांभीर्याने विचार न करणाऱ्या या मंडळींसाठी आता खुद्द पंतप्रधानांनी लहानग्यांच्या खेळ सर्वांसक्षम आणला आहे. भल्याभल्यांनाही ज्या गोष्टी समजून घेण्यात काहीसा वेळ लागला, तिथेच काही चिमुरड्यांनी मात्र त्यांच्या खेळातून कोरोना व्हायरस म्हणजे नेमकं काय, तो कसा पसरतो आणि त्याची लागण होण्याची साखळी नेमकी कशी तोडायची हे अगदी प्रभावीपणे दाखवले आहे. असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

First Published on: April 17, 2020 9:00 AM
Exit mobile version