चिखलोलीतील घनकचरा डम्पिंग तात्काळ बंद करा

चिखलोलीतील घनकचरा डम्पिंग तात्काळ बंद करा

अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिकेने चिखलोली परिसरात सुरू केलेले डम्पिंग ग्राउंड तात्काळ बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहे. या ठिकाणी कचरा टाकल्या प्रकरणी लवादा ने अंबरनाथ नगरपालिके ला दंड ही ठोठवला असून दंडाची रकम तत्काळ भरा असे निर्देश दिले आहेत.

अंबरनाथमधील चिखलोली गावात नगरपालिकेने कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड सुरु केले होते. या डम्पिंग ग्राउंड च्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशाना या कचऱ्यापासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता गेली. चार महिन्यांपासून येथील रहिवासी राष्ट्रीय हरित लवादात डम्पिंग ग्राउंड विरूद्ध लढा देत होते.

अंबरनाथ शहराचा कचराप्रश्न गेल्या काही वर्षात पासून गंभीर बनत चालला आहे. अनेक वर्षांपासून अंबरनाथ पालिका ज्या मोरिवली भागात कचरा टाकत होती. ती जागा कनिष्ट न्यायालयाच्या उभारणीनंतर बंद करावी लागली. त्यामुळे गेल्या वर्षा पासून नगरपालिकेच्या वतीने चिखलोली भागातील सर्वेक्षण क्रमांक 132 या भूखंडावर कचरा टाकण्यास सुरूवात करण्यात आली होती. सुरूवातीला कचऱ्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कचऱ्याचा त्रास जाणवला नाही. मात्र यंदाच्या वर्षात पावसाळ्यात या कचऱ्यातून पाणी झिरपून ते आसपासच्या रहिवाशांच्या जमिनीतील पाण्याच्या टाक्यांपर्यंत पोहोचले. दुर्गंधी दूषित पाणी आणि डासांमुळे त्रस्त स्थानिकांनी या डम्पिंग ग्राऊंड विरूद्ध राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली होती.

त्यानंतर लवादाने अंबरनाथ नगरपालिका, स्थानिक प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाहणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाहणी करत या डम्पिंग चा नागरिकांना त्रास असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पालिका प्रशासनाला अनेक सूचना दिल्या होत्या. त्यात पर्यायी जागा हा महत्वाचा पर्याय होता. मात्र तो उपलब्ध न झाल्याने त्याच ठिकाणी कचरा टाकणे सुरू होते. अखेर या सुनावणीच्या शेवटी या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास तातडीने बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.

 

First Published on: December 9, 2022 10:45 PM
Exit mobile version