येत्या तीन दिवसात पडणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज

येत्या तीन दिवसात पडणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासूनच्या रजेवर गेलेला पाऊस गणेश चतुर्थीचा मूर्हत साधत दाखल झाला होता. या दाखल झालेल्या पावसाच्या सरी महाराष्ट्रासह मुंबईत पडत असून पुढचे तीन दिवसही पावसाचे असणार असल्याचा अंदाड स्कायमेटने वर्तवला आहे. मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून स्कायमेट या खासगी वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे ही परिस्थिती गेल्या काही काळापासून कायम असून याचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पूरस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगाणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या भागात पडणार पाऊस

सातारा, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये साधारण ते मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तसेच पुढील तीन दिवसांनंतर आठवड्याच्या शेवटी पश्चिम किनाऱ्यावर विशेषतः मुंबई, कोकण, गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा – पुण्यात फालूदा खाताना तोंडात आले ब्लेड


 

First Published on: September 16, 2019 6:39 PM
Exit mobile version