तर पोलिसांनीही सामंजस्याने वागावे – शरद पवार

तर पोलिसांनीही सामंजस्याने वागावे – शरद पवार

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह देशात लॉकडाऊन घेण्यात आला असून, संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्थासाठी तैनात करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला या दरम्यान एका व्यक्तीने पोलिसांचा त्रास होत आहे. पोलीस सक्ती करत आहेत असा प्रश्न शरद पवार यांना विचारला त्यावेळी शरद पवार यांनी  त्या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावेळी शरद पवार यांनी सध्या राज्यात शिस्तीची गरज आहे. पोलिसांना इच्छा नसताना काही कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचे सांगत त्याचा परिणाम आता दिसत असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी लोक शिस्तीने वागत असल्याचे सांगत काही चार-पाच टक्के लोकांसाठी कठोर भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे थोडे दिवस हे सहन करावे लागेल. परिस्थिती बदलत आहे, लोक सहकार्य करत आहेत त्यामुळे हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सामंजस्याने वागावे असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच अत्यावश्यक सेवेच्या गाडयांना अडवू नये” अशी सूचना देखील शरद पवार यांनी केली आहे.

आणखी काय म्हणालेत शरद पवार

आरोग्य सेवा आणि पोलीस आज आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यांना विशेष प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच करोनाशी सगळ्यांनी एकत्र लढा देण्याची गरज राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. करोनाचे संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे असे शरद पवार म्हणालेत.

First Published on: March 27, 2020 12:55 PM
Exit mobile version