पेट्रोलचे दर शंभरीपार

पेट्रोलचे दर शंभरीपार

Petrol Diesel Price Drop: भाजपशासित राज्यांत पेट्रोलचे दर १२ ते १५ रुपयांनी घसरले, महाराष्ट्राचं काय?

नाशिकमध्ये पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे. गेल्या एक दोन दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र मंगळवारी पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ होऊन दर प्रतिलिटर १००.१५ पैसे इतका दर झाला. तर डिझेलचे दर ९०.६३ रूपयांवर जाऊन पोहचले. मे महिन्यात तब्बल १३ वेळा इंधनाचे दर वाढले.

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. सोमवारी नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १७ पैशांनी वाढून ९९.९७ रूपये प्रतिलिटरवर पोहचले. तर डिझेलमध्ये २८ पैशांनी वाढ होउन ९०.३७ रूपये प्रतिलिटरवर पोहचले. मेच्या सुरूवातीपासूनच इंधन दरवाढीचा आलेचा सातत्याने चढाच आहे. दर दिवसाआड इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोलचे दर परवडत नसल्याने गाडया बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संकटाशी मुकाबदला करतांना नागरिक त्रस्त झालेले असतांना त्यात लॉकडाऊन आहे. अनेक उद्योगधंदे या लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत, अनेकांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत महागाई वाढली आणि त्यात वाढत चाललेले इंधन दर. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
पेट्रोलच्या किमतीपेक्षा यावर आकारण्यात येणारे कर कितीतरी पटीने अधिक आहेत. एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत 38 रुपये 10 पैसे आहे. त्यात एक्साईज ड्युटी 32 रुपये 98 पैसे, राज्य शासनाचा टॅक्स 26 रुपये 26 पैसे आणि डीलरचे कमिशन 3 रुपये 41 पैसे आहे. त्यामुळे पेट्रोलची मूळ किंमत आणि कर पहाता किती मोठ्या प्रमाणात हा नागरिकांना कर द्यावा लागतो हे स्पष्ट होते.

कोविडमुळे अगोदरच व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने इंधनावरील टॅक्स कमी करायला हवे. आज अवैध मार्गाने बायोडिझेलची मोठया प्रमाणावर विक्री होत असल्याने याचा फटका पेट्रोल चालकांना बसतोय. डिझेलचे दर वाढल्याने पर्यायी डिझेल जे काळाबाजारात मिळतेय त्याचा खप प्रचंड वाढला आहे. या बायोडिझेलचा दर ७० रूपये लिटर असल्याने लोक तो पर्याय निवडतात. त्यामुळे सरकारचा प्रचंड मोठा महसूल बुडतो.
भूषण भोसले, अध्यक्ष, पेट्रोल डिलर असोसिएशन

 

१ मे पासुन १३ वेळा दर वाढलेले आहेत . १ मे पासुन पेट्रोल मध्ये सुमारे तीन रुपये तर डिझेलमध्ये सुमारे साडेचार रुपये वाढलेले आहेत. पेट्रोलच्या दरातील बदलांची मुख्य कारणे आतंरराष्ट्रीय बाजारातील क्रुड ऑईलचे दर ,डॅालरचा विनिमय दर , राज्य व केंद्र शासनाचे विविध कर , केंद्र शासनाने अवलंबलेली दररोज दर बदलण्याची पद्धत आदी आहेत.
विजय ठाकरे, उपाध्यक्ष फामपेडा ( राज्य पेट्रोल डिलर्स संघटना )

 

First Published on: May 25, 2021 9:25 PM
Exit mobile version