कल्याण येथे रुग्णाला दाखल करून न घेणाऱ्या ‘आयुष्य रुग्णालया’ची तोडफोड

कल्याण येथे रुग्णाला दाखल करून न घेणाऱ्या ‘आयुष्य रुग्णालया’ची तोडफोड

रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेत नसल्याच्या कारणावरून नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी दुपारी कल्याणच्या खडकपाडा येथे घडला. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रितेश आंबेकर, प्रतीक आंबेकर, प्रकाश आंबेकर, नवले आणि इतर ८ जण अशा एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टर आणि इतर कर्मचारी आणि डॉक्टर यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिम खडकपाडा येथील आयुष्य रुग्णालयात रविवारी दुपारी आंबेकर यांच्या नाईवाईकाला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही म्हणून संतापलेल्या प्रितेश आंबेकर, प्रतीक प्रकाश आणि इतर नातेवाईकानी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या खडकपाडा पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

First Published on: September 21, 2020 11:35 PM
Exit mobile version