बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी शिंदे गटाने दाखल केली तक्रार

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी शिंदे गटाने दाखल केली तक्रार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल सायंकाळी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन अभिवादन केले. यावेळी शिंदे गटातील अनेक आमदार उपस्थित होते. मात्र, यांचं अभिवादन झाल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. यावरून शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक आमदार यांनी१६ नोव्हेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आले होते. सर्वांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आणि काही क्षणांतच स्मृती स्थळावरून प्रस्थान केले. हे सर्व दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी होती म्हणून पूर्वसंध्येला दर्शन घेऊन गेले. परंतु, काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या शिवसेना नतदृष्ट पदाधिकाऱ्यांने दोन गटात वाद निर्माण करण्याच्या हेतूने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे मंत्री तसेच, आमदार यांचा हेतूपुरस्कृत अपमान करण्याचे काम या पदाधिकाऱ्यांनी केले आहे, असा आरोप शिवसेना (शिंदे गट) विभाग प्रमुख शिरीश धानुरकर यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. तसंच, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, महेश सावंत, खासदार अरविंद सावंत यांचाही उल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे.

First Published on: November 17, 2022 4:10 PM
Exit mobile version