दिवाळीसाठी सुरू केलेल्या ‘विशेष रेल्वे’ ऐन दिवाळीतच होणार बंद

दिवाळीसाठी सुरू केलेल्या ‘विशेष रेल्वे’ ऐन दिवाळीतच होणार बंद

कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सुरू केली होती. या विशेष रेल्वे सुरू करताना रेल्वे विभागाने प्रवाशांना आरक्षण करणे सक्तीचे केले होते. दरम्यान याच खास दिवाळीसाठी सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने व्यवसाय कमी होत होता. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ४ विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासह सर्वच गाड्यांना आरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य नसल्याने प्रवाशांनीही सणाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण करीत प्रवास करणे पसंत केले होते. परंतु रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असून व्यवसाय कमी होत असल्याचे कारण पुढे करीत दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाने काही ठराविक विशेष रेल्वेही सुरू केल्या होत्या. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड – पनवेल – नांदेड, धर्माबाद नांदेड धर्माबाद, काचिगुडा नरखेड काचिगुडा, काचिगुडा अकोला काचिगुडा या रेल्वे २३ ते २८ ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू केल्या होत्या. या सर्व रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आरक्षण गरजेचेच असल्याची अट घातली होती. मात्र या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे सांगून सर्व रेल्वे जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ज्यात नांदेड पनवेल नांदेड ही २३ व २४ ऑ्क्टोबर रोजी सुरू केली होती. ती ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रेल्वे नांदेड येथून २३ व पनवेल येथून २४ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच, या शिवाय काचिगुडा नरखेड काचिगुडा विशेष रेल्वे २३ व २४ ऑक्टोबर रोजी सुरू केली असून ती २९ व ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र, ही विशेष रेल्वेही १६ नोव्हेंबरला काचिगुडा येथून तर अकोला येथून १७ नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करेल, असे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. तर धर्माबाद मनमाड धर्माबाद ही रेल्वे २४ ऑक्टोबर रोजी सुरू केली होती. ती पण ३० नोव्हेंबरपर्यंत धावेल असे म्हटले होते. मात्र, १५ नोव्हेंबर ऐन दिवाळीमध्येच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिवाळी सण समोर ठेवून सुरू केलेली ही दिवाळीच्या दिवशीच बंद करण्यात येणार आहे.


बॉलिवूडला अजून एक धक्का: अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

First Published on: November 12, 2020 7:29 PM
Exit mobile version