Video: प्ले स्कुलमध्ये शिक्षिकेची लहान मुलाला मारहाण, पालकांनो सतर्क रहा

Video: प्ले स्कुलमध्ये शिक्षिकेची लहान मुलाला मारहाण, पालकांनो सतर्क रहा

नाशिकमध्ये शिक्षेकेची विद्यार्थ्याला मारहाण

नाशिकमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नाशिकच्या पाईपलाईन रोडवरील एका खासगी प्ले स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिक शहरातून या शिक्षिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरणसमोर आल्यानंतर मुलाच्या पालकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ पाहा – 

 

श्रेयस महेंद्र पवार असे या चिमुकल्याचे नाव आहे. श्रेयस गेल्या काही दिवसापासून आजारी होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याचे आई-वडिल काही दिवसांपूर्वी त्याला नाशिकमध्ये घेऊन आले होते. त्या दरम्यान त्यांनी श्रेयसला प्रज्ञा ग्रुप ऑफ प्ले स्कूलमध्ये टाकले. या प्ले स्कूलमधील एका शिक्षिकेने श्रेयसला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समार आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या शिक्षिकेवर कडक कारवाई करुन प्ले स्कूल कायमचे बंद करावे अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

First Published on: March 9, 2019 4:11 PM
Exit mobile version