Corona Virus : राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही – राजेश टोपे

Corona Virus : राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही – राजेश टोपे

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, रविवारी कोरोना आढावा बैठक पार पडली. जवळपास तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना कोरानाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या, याबाबत माहिती दिली. दरम्यान, राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही, असेदेखील राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय म्हणाले आरोग्य मंत्री

कोल्हापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट हा ३५ टक्के आहे. तो ५ टक्क्यांवर आणायचा आहे. ग्रोथ रेट वाढतोय. बाहेरच्या लोकांपासून होणारा संसर्ग कमी होतोय. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्याती गरज आहे. तर साताऱ्यात नवीन RTGS एक लाख टेस्टिंग सुरु करत आहेत. त्यामुळे सातारा आता पुण्यावर कमी अवलंबून राहील. आमचा मृत्यू दर कमी करणं आणि लवकर निदान करण्यावर भर आहे. टेस्टिंग रेट वाढवायचा आहे. रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. राज्य सरकारने ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. या खटल्यामुळे सर्व भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, राज्यात सध्या कोरोनाने महाभयंकर परिस्थिती आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला स्थगितीतून वगळण्यात यावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पायपीट!

First Published on: August 9, 2020 4:14 PM
Exit mobile version