एकाच आठवड्यात तिसरे पिस्तुल हस्तगत

एकाच आठवड्यात तिसरे पिस्तुल हस्तगत

पुणे : शहरानजिक गावठी पिस्तुल हाताळत असताना मयुर जयसिंग गायकवाड (वय-२४) रा. तिन्हेवाडी राजगुरुनगर याला राजगुरुनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल एक काडतुस मिळून आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

गणेशोत्सव काळात चोख बंदोबस्त असताना देखील एकाच आठवड्यात खेड तालुक्यातील परिसरात तीन वेगवेगळ्या व्यक्तींकडे गावठी पिस्तुले आढळून आली आहेत.त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सव सुरू असताना अशा प्राणघातकी हत्यारांचा वापर होत असल्याने खेड तालुक्यात खळबळ पसरली आहे. जमिनीला वाढलेले बाजार भाव,तरुण वयात हातात येणारा पैसा अशा अनेक गोष्टींमुळे हत्या,प्राणघातकी हल्ले,विनयभंग,बलात्कार अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. मध्यप्रदेश राज्यातून चाकण राजगुरुनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तुले आणली जात आहे आणि तरुण वयातील मुलांना विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

First Published on: September 23, 2018 4:45 AM
Exit mobile version