Video: भोंगा वाजलाय, करोना व्हायरस विरोधात युद्ध सुरु झालंय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Video: भोंगा वाजलाय, करोना व्हायरस विरोधात युद्ध सुरु झालंय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोना व्हायरस देशभरात हातपाय पसरत असला तरी आपण त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. वैद्यकिय सेवा, अन्न धान्याचा पुरवढा आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. फक्त राज्य सरकारने जे निर्देश दिले आहेत. ते लोकांनी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. एवढेच सांगतो की, युद्ध सुरु होण्यापुर्वी जसा भोंगा वाजतो, तसा तो आता वाजलेला आहे आणि करोना व्हायरसच्या विरोधात युद्ध सुरु झालेले आहे. युद्धात ज्याप्रमाणे शिस्तबद्ध तयारी केली जाते, तशी आपण केली आहे. फक्त जनतेने सहकार्य करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

हे संकट जात-पात पाहत नाही. युद्धात कुणाचीही जात विचारली जात नाही. त्याप्रमाणे हे संकट माणूस बघून येत नाही. त्यामुळे सर्वांनी हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, याची जाणीव ठेवावी. सरकार आपल्यापरिने निर्णय घेत आहे. मात्र जनतेने स्वतःहून प्रवास टाळण्याची गरज आहे. चीनने ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम पद्धत सुरु करुन गर्दी टाळली आणि करोनाच्या संकटातून बाहेर पडले. त्याप्रमाणे आपण देखील या संकटातून बाहेर पडू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे आपल्या भाषणात – 

 

First Published on: March 19, 2020 12:26 PM
Exit mobile version