LockDown: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर

LockDown: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर

रेल्वे

आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, भाविक पर्यटक आणि विद्यार्थी तसेच इतर व्यक्तींना आता त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जिल्‍हा प्रशासनाने आज तसा आदेश काढला असून जे ग्रीन आणि ऑरेंज झोनमधून येतील, अशा लोकांना २८ दिवस होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. पुणे, मुंबईसारख्या भागातून येणाऱ्या लोकांसाठी १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि त्यानंतर पुढील १४ दिवस गृह विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची जारी केलेल्या पत्रकामध्ये दिली आहे. त्यामुळे आता कोकणात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या चाकरमान्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबईत अडकून पडले कोकणातील चाकरमानी 

राज्यात लॉकडाऊन असल्याने मुंबईमध्ये कोकणातील चाकरमानी अडकून पडले आहेत. मात्र आता कोकणी चाकरमान्यासंबंधीचा महत्वाचा निर्णय येत्या चार दिवसांत होईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दिली होती. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून त्या संदर्भात आता पाठपुराव्याला वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आशिष कुमार सिंग यांनी या संदर्भात आमदार भास्कर जाधव तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती स्वतः जाधव यांनी दिली होती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी आता आमदार भास्कर जाधव देखील काही दिवसांत चांगली बातमी देतील, अशी आशा चाकरमान्यांना वाटू लागली आहे.

हेही वाचा –

Lockdown 3: वाचा १७ मे पर्यंत काय चालू आणि काय बंद?

First Published on: May 1, 2020 11:39 PM
Exit mobile version