राज्यात सापडले १००८ करोना रुग्ण

राज्यात सापडले १००८ करोना रुग्ण

राज्यातील रेड झोन वगळता अन्य झोनमध्ये संचारबंदी शिथिल करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरु असताना शुक्रवारी राज्यात तब्बल १००८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे संचारबंदी उठवल्यास करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमानात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी मुंबईमध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 485 वर पोहचली आहे.

राज्यात शुक्रवारी 1008 नवे रुग्ण मिळाल्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या ११,५०६ वर पोहचली आहे. तसेच राज्यात २६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक १०, मुंबई ५, जळगाव ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्ग १, भिवंडी १, ठाणे १, नांदेड १ , औरंगाबाद १ तर परभणीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या शिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

मृतांमध्ये १८ पुरुष तर ८ महिला आहेत २६ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवारी १०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,५३,१२५ नमुन्यांपैकी १,४०,५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११,५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,८४९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,६३,०२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११,६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: May 2, 2020 6:54 AM
Exit mobile version