पोलीस शिपायासह ३ जण गोदावरी नदीत बुडाले

पोलीस शिपायासह ३ जण गोदावरी नदीत बुडाले

प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्र-तेलंगणा या राज्यांना जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने तीन लोकांना जलसमाधी दिल्याची भाती वर्तवली जात आहे. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास एका पोलीस शिपायासह ३ जण बुडाल्याची दु:खद घटना घडली. नदी पात्राच बुडालेला पोलीस शिपाई हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरामधल्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पोलीस शिपाई अनिल दशरथ कुडमेते (२८), मारोती पोरेते (२३) आणि  रोहित राजेश्वर कुडेते (२१) अशी गोदावरी नदीत बुडालेल्या ३ जणांची नावं आहेत. हे तिघंही चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातील होते. ही घटना घडल्यानंतर बरेच तास उलटून गेल्यामुळे बुडालेल्या तिघांचाही मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सुरु असलेला तपास संध्याकाळी अंधार पडल्यामुळे थांबवण्यात आला. दरम्यान, बुडालेल्या तिघांचाही अद्याप तपास लागलेला नाही.

घटना सविस्तर…

गोंडपिंपरी तालुक्यातील ७ ते ८ जण एका वाहनातून कालेश्वराच्या दर्शनासाठी सिरोंचामधल्या गोदावरी नदीच्या पात्राजवळ पोहोचले. आधी गोदावरीत नदीत उतरून अंघोळ करायची आणि मग पुढे देवदर्शनासाठी निघायचं असा या लोकांचा बेत होता. त्यांच्यासोबत वाहन चालकही होता. ठरल्याप्रमाणे सर्वजण अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले पण काहीवेळाने दशरथ, मारोती आणि रोहित नदीच्या पात्रात खोलवर गेले असता बुडाले. या प्रकारामुळे घाबरलेले त्यांचे अन्य साथी त्वरित नदी काठावर आले आणि त्यांनी नजीकच्या तेलंगणा पोलीस स्थानकात याविषयी कळवले. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलीस घटनास्थळी आले आणि घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर लगेचच बचाव पथकाच्या मदतीने या तिघांना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली. मात्र, संध्याकाळ होईपर्यंत बुडालेल्या तिघांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर अंधार पडल्याने ही शोध मोहिम थांबवली गेली. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाविषीयी स्थानिकांकडून तसंच बुडालेल्या तिघांच्या मित्रांकडून सविस्तर माहिती घेतली. तसंच बेपत्ता असेलल्या त्या तिघांविषयी मिसींग कम्प्लेंटही नोंदवण्यात आली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा या तिघांचा तपास घेण्यासाठी शोध मोहिम राबवली जाणर असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे.
First Published on: November 21, 2018 9:22 PM
Exit mobile version