सोलापुरात आढळले नवे ३ पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३० वर

सोलापुरात आढळले नवे ३ पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३० वर

कोरोना व्हायरस

सोलापुरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून आज पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या ३० वर गेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

३० जणांवर उपचार सुरु

सोलापुरातील कुमठा नाका येथील भारतरत्न इंदिरा नगरातील दोन रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याठिकाणी काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात येणाऱ्यांना सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर नईजिंदगी येथील शिवगंगानगरात राहणारी महिला आजाराने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नमुने प्रयोग शाळेत तपासले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सोलापुरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ इतकी झाली असून यातील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३० जणांवर उपचार सुरु आहेत.

नऊ हॉटस्पॉट

सोलापुरातल दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट तयार झाले आहेत. यामध्ये मंगळवारी मोदीखाना, शास्त्रीनगर आणि मदरइंडिया झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. तेथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर आज शिवगंगानगरातील महिला पॉझिटिव्ह आढळल्याने आता हा भाग देखील सील करण्यात आला आहे. त्यामुळे आतातरी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.


हेही वाचा – नववी आणि अकरावीचा निकाल अद्यापही गुलदस्त्यात


 

First Published on: April 22, 2020 8:25 PM
Exit mobile version