मगर पाहण्यासाठी पुणेकरांची भिडे पुलावर गर्दी

मगर पाहण्यासाठी पुणेकरांची भिडे पुलावर गर्दी

मगर पाहण्यासाठी पुणेकरांची भिडे पुलावर गर्दी

शुक्रवारी पुण्यातील भिडे पुलाखालील नदी पात्रात मगर दिसल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पुणेकरांनी मगर पाहण्यासाठी भिडे पुलावर तोबा गर्दी केली होती. काही अवली पुणेकर जवळून मगर पाहण्यासाठी थेट नदी पात्रातचं धाव घेतली. याची महिती पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला कळताच पोलिसांची धावपळ सुरु झाली. परंतु पोलिसांनी खरोखरचं ती मगर आहे का याची खातरमजा केली. यावेळी नदीपात्रात मगर नसल्याचे निश्चित झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र यावेळी झालेली गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना अधिक मेहनत घ्यावी लागली.

नदी पात्रात मगर आढळल्याची अफवा पसरल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरणही निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी बारकाईन पाहणी केली असता ती मगर नसून पाण्यातील कचऱ्यात अडकलेली प्लॅस्टिकची बाटली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी नदीपात्रात मगर असल्याचे अफवेला तिथेचं पूर्णविराम दिला. पाण्याच्या प्रवाहामुळे बाटली हलत असल्याने नागरिकांना ती मगर असल्याचे वाटले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिसही कामाला लागले.

 

 

First Published on: February 12, 2021 7:32 PM
Exit mobile version