पुण्यात एका दिवसात ८३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ९ जणांचा मृत्यू

पुण्यात एका दिवसात ८३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ९ जणांचा मृत्यू

देशभरासह राज्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४९७ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील चिंताजनक परिस्थिती असून पुण्यात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे ८३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या २७ हजार ३४० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर १ हजार १७ रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर ४८६ क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात १७४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले ६१४ रुग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्जही देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ हजार ३५७ झाली असून पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ९ हजार ४१४ एवढी आहे. तर आतापर्यंत ८४९ जणांना आपला प्राण कोरोनामुळे गमवावा लागला आहे.


मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण, तर ४७ जणांचा मृत्यू

First Published on: July 13, 2020 11:59 PM
Exit mobile version