Omicron Variant: राज्यात आज १० ओमिक्रॉन रुग्णांची नोंद, टोपेंची माहिती

Omicron Variant: राज्यात आज १० ओमिक्रॉन रुग्णांची नोंद, टोपेंची माहिती

Corona Virus : शरद पवारांची कोरोना आढावा बैठक संपली, रेल्वे, कडक निर्बंधांसह लॉकडाऊनवर चर्चा

राज्यात हळूहळू ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आज एकूण १० ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून ६५ नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे. या सर्वांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सध्या राज्यात जिनोम सिक्वेन्सिंगसाठी ३ लॅब आहेत. नागपूर आणि औरंगाबादमध्ये जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅबचा विस्तार करणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याबाबतचे ट्वीट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.

काल, मंगळवारीही १० ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटेंनी दिली आहे. विमानतळावर आलेल्या जवळपास ३० हजार प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले होते.

काही दिवसांपूर्वी राजे टोपे म्हणाले होते की, ‘सध्या जिनोम सिक्वेंसिंग करण्याच्याबाबी खूप वाढल्या असल्यामुळे आपल्या जवळ आज असलेल्या तीन जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या लॅब आहेत. बीजे मेडिकल पुणे, कस्तुरबा गांधी मुंबई, केंद्र शासनाची नॅशनल इस्टिट्यूट वायरोलॉजी पुणे या तीन पेक्षा आणखीन दोन लॅब वाढवाव्यात असे म्हणणे टाक्स फोर्सचे चेअरमन ओक यांचे आहे. एक औरंगाबाद आणि एक नागपूराला जिनोम सिक्वेंसिंगची लँब तयार करण्यात येईल.’

‘शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणे हे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल. त्यामुळे परिस्थितीवर आपण लक्ष्य ठेवू आणि परिस्थिती कशी आहे, त्या अनुषंगाने मग केंद्र शासनाचे मार्गदर्शन आणि टास्क फोर्सचे मार्गदर्शन, मुख्यमंत्र्यांचे मत या सगळ्याच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू. आज शाळा सुरू झाल्या आहेत, ज्यांनी सुरू केल्या नाहीत त्यांनी शाळा सुरू कराव्यात. अशी आमची सूचना आहे. कोविड विरोधातील वर्तन दररोज आपण पाळावे आणि लसीकरणावर अधिक जोर द्यावा,’ असे राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा – Omicron Variant : तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका? WHO ने दिली महत्त्वाची माहिती


First Published on: December 8, 2021 7:07 PM
Exit mobile version