मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच

मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच

राज्यात जेव्हापासून सत्तानंतर झाले शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून सुरू झालेले मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आजही सुरूच आहे.

महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने महापालिका परिमंडळ – ४ सह आयुक्त विजय बालमवार यांची शुक्रवारी सह आयुक्त ( विशेष) पदी बदली करण्यात आली आहे. तर उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांचीही उपायुक्त परिमंडळ -४ च्या उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

विजय बालमवार यांच्याकडे संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष) पालिका परिक्षेत्रातील पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधेची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकारी ही जबाबदारी तशीच ठेवण्यात आली आहे. तर, उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे परिमंडळ – ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

उपायुक्त (मध्यवर्ती खाते) यांच्याकडील नियोजन खाते, महिला व बालकल्याण व राष्ट्रीय नागरी उपजीविका, नियोजन, जिल्हा नियोजन व जिल्हा नियोजन आणि विकास अभियान याचा कार्यभार उपायुक्त (विशेष) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


हेही वाचा : बेस्टच्या कंत्राटी चालकांचे मोफत प्रवासासाठी आंदोलन; प्रवाशांना फटका


 

First Published on: September 2, 2022 10:47 PM
Exit mobile version