स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : वसई-विरारमध्ये तिरंगा रॅली, अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : वसई-विरारमध्ये तिरंगा रॅली, अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

वसई : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. केंद्र सरकारने यानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले असून त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त वसई-विरार शहरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून आज सकाळी भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये शाळकरी मुले, तरुण-तरुणी यांच्यासह वयोवृद्ध नागरिक सहभागी झाले होते.

वसई तहसील कार्यालयापासून नालासोपारा शहर मार्गे विरारच्या विवा महाविद्यालयापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. विवा महाविद्यालयाजवळ आज सायंकाळी या रॅलीचा समारोप होणार आहे. पालिका कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच हजारोच्या संख्येने वसई विरारकरांनी या तिरंगा रॅली सहभाग नोंदवला आहे. या भव्य रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याचेही सांगण्यात येते.

‘हर घर तिरंग्या’साठी रजिस्ट्रेशन गरजेचे
देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवली जात आहे. 13 ऑगस्टपासून या अभियानाला सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत घराघरांत भारताचा झेंडा लावला जात आहे. या अभियानात सहभाग घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. घर किंवा कार्यालयावर तिरंगा फडकवण्याआधी तुम्हाला ‘हर घर तिरंगा’च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. होम पेजवर तुम्हाला PIN A Flag वर क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर एक नवी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही नाव आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देत नसाल तर तुम्ही Google Account चा वापर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला Location Access द्यावे लागणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी लोकेशनवर Virtual Flag ला जागा देऊ शकता. Registration केल्यानंतर तुम्ही सेल्फी अपलोड करू शकता.

First Published on: August 14, 2022 1:31 PM
Exit mobile version