टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामी आरोपी; मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामी आरोपी; मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामी आरोपी; मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

टीआरपी घोटाळ्यात (TRP Scam) रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरमई मुंबई पोलिसांनी आज सत्र न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा पहिल्यांदाच आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

नऊ महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीची कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचं नाव आलं होतं. या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात १८०० पानांची पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. अर्णब गोस्वामी यांचा पहिल्यांदाच आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह सात जणांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या २२ झाली आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अर्णब गोस्वामीविरोधात ठाम पुरावे असल्याचं गुन्हे शाखेचं मत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटचाही या आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टीआरपी कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर रेटिंग एजन्सी बीएआरसीने हंसा रिसर्च ग्रुप (एचआरजी) मार्फत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार काही टीव्ही चॅनेल्स टीआरपीचे क्रमांक वाढवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

First Published on: June 22, 2021 6:02 PM
Exit mobile version