तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक अटकेत

तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक अटकेत

तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक अटकेत

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार प्रकरणी  पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तात्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. तुळजाभवानी मंदिर अलंकार गैरव्यवहार झाल्यापासून आरोपी नाईकवाडी तब्बल एक वर्षापासून फरार होता. मात्र रविवारी (२० सप्टेंबर) त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. नाईकवाडी यांच्याविरोधात तब्बल ३५ तोळ सोनं, ७१ किलो चांदी आणि ७१ प्राचीन नाणी चोरी केल्याचे आरोप आहेत. नाईकवाडी यांच्या १७ वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्प्या टप्प्यांने पुरातन नाणी गायब केली आहेत. त्यामुळे या काळात त्यांना कोण मदत केली? त्यांचे साथीदार आणि सूत्रधार कोण? ही नाणी सध्या कुठे आहेत, यासह अन्य बाबी आता तपासाअंती समोर य़ेणार आहेत.

गतवर्षी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक अन्य दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर दागिने चोरी गेल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. तुळजाभवानी आईच्या मंदिरातील खजिन्यातील ७१ ऐतिहासिक आणि पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी प्रकरणाची गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती.

तुळजाभवानी आईला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवीचारणी अर्पण केली होती. १९८० पर्यंत या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये होती. मात्र २००५ आणि २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या दागिन्यांच्या नोंद दप्तराची मागणी केली होती. त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते, अखेर या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजांनी सोन्या, चांदीच्या दागिन्यासह अनेक नाणी अर्पण केली होती. या दागिन्यांची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती. परंतु पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार झाल्याची चौकशी समितीने सिद्ध केले. देवीच्या खजिन्यातील मौल्यवान नाण्यांसह इतर संस्थानची नाणी आणि वस्तू लंपास झाल्या असून यात प्रकरणात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


Kirit Somaiya : सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, सोमय्यांच्या आरोपावर शिवसेनेची प्रतिक्रिया


 

First Published on: September 20, 2021 1:17 PM
Exit mobile version