गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, अपघातात बसचालक गंभीर जखमी

गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, अपघातात बसचालक गंभीर जखमी

रत्नागिरी – जिल्ह्यातील गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अपघड वळणावर समोरासमोर धडकल्या. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांनी RGPPL च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत असून पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुरु आहे बचाव कार्य सुरु आहे.

गुहागर तालुक्यात आज धोपावे- चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस विरुद्ध दिशेन येत होत्या. मात्र, एका अवघड वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही चालकांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस एकमेकांवर आदळल्या. अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, ज्यात दोन्ही बसमधील चालकांना गंभीर दुखापत झाली. होन्ही बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींवरही उपचार सुरु करण्यात आले. तर चालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोकणात पावसाची संततधार  –

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. तर तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संतातधार सुरु आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे.  संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तिलारी धरणातून तिलारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

First Published on: September 12, 2022 12:01 PM
Exit mobile version