केंद्रातून दोन सनदी अधिकारी राज्यात!

केंद्रातून दोन सनदी अधिकारी राज्यात!

महाराष्ट्रात मंगळवारपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली असून आता राज्याची सर्व सूत्र राज्यपालांच्या हाती आहेत. राज्याचा गाडा आता केंद्रातून हाकण्यात येणार असल्याने राज्यात येत्या काळात दोन केंद्रीय सनदी अधिकार्‍यांना राज्यात पाठवण्यात येणार आहे. हे अधिकारी लवकरच मंत्रालयात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यामुळे राज्याचा कारभार आता राज्यपालांमार्फत केंद्रीय गृहमंत्रालय चालवणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून दोन सनदी अधिकारी राज्यात येणार आहेत. हे सनदी अधिकारी राज्यपालांचे सल्लागार असतील. ते राज्यपालांच्या देखरेखीखाली खर्‍या अर्थाने राज्याचा कारभार हाकतील. इतकेच नाहीतर राज्यपालांच्या परवानगीने महत्त्वाचे निर्णयही घेतील. महाराष्ट्रात कोणाला पाठवायचे, याची तयारी केंद्र सरकारने पूर्ण केली असून सहा सनदी अधिकार्‍यांचे यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतून दोन अधिकार्‍यांना महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे.

निवडण्यात येणारे दोन सनदी अधिकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मर्जीतील असतील, अशी शक्यता वर्तवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हे अधिकारी महाराष्ट्रा कॅडेटमधील नसावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. येत्या दोन दिवसांत या अधिकार्‍यांची निवड केली जाणार असून त्यानंतर लगचेच ते मंत्रालयात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. हे अधिकारी मंत्रालयातूतच आपले रोजचे काम पाहणार आहेत. हे अधिकारी नेमके कोण असणार आहे, याकडे मंत्रालयातील सर्व अधिकार्‍यांबरोबरच सनदी अधिकार्‍यांचे देखील याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

First Published on: November 14, 2019 5:20 AM
Exit mobile version