विरारमध्ये एकाच कुटुंबातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

विरारमध्ये एकाच कुटुंबातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

वसई: विरार फाटा येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन मुलांचा विष बाधेमुळे मृत्यू झाला आहे. आणखी तीन मुलांनाही विषबाधा झाली असून त्यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

विरार फाटा येथे राहणाऱ्या विरार फाटा येथे अश्फाक खान आणि रजिया खान आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी रात्री 11 वाजता मुलांनी जेवण केले. रात्री उशिरा सात वर्षांची मुलगी फरहीन हिला उलट्या सुरू झाल्या. तिला डॉक्टरांकडे नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घरी परत आले तेव्हा नऊ वर्षांचा आसिफ बेशुद्ध झालेला आढळून आला. डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले.त्यातच घरी फरहाना (7), आरिफ (४) आणि साहिल (३) या तिघांना उलट्या सुरू झालेल्या होत्या. त्यामुळे तिघांना उपचारासाठी नालासोपाऱ्याच्या विजय नगरमधील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील सात वर्षीय मुलगी फरहाना ची स्थिती नाजूक आहे. मांडवी पोलिसांनी दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मागील जून महिन्यात सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे हा प्रकार घडला होता. आर्थिक कारणांमुळे हे कुटुंब तणावात होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून कुटुंबातील ९ सदस्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.


हेही वाचा : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज मोठी वाहतूक


 

First Published on: August 13, 2022 9:43 PM
Exit mobile version