तुमची मुलंही मोबाईल बॅटरीसोबत खेळतायत; तर हे नक्की वाचा

तुमची मुलंही मोबाईल बॅटरीसोबत खेळतायत; तर हे नक्की वाचा

मोबाईलची बॅटरी बाहेर काढून त्या बॅटरीसह खेळताना एक धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. ही मोबाईलची बॅटरी खेळत असताना त्या बॅटरीचा स्फोट झाल्याने यात दोन भावंडे जखमी झाली. ही घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील घोडके वस्तीत ही घडली.

या स्फोटात दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा रामेश्वर जाधव (८) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (५) अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत.

यावेळी हा स्फोट कसा झाला, स्फोट झालेल्या मोबाईल बॅटरी कोणत्या कंपनीची होती. या बाबत अधिक कोणतीच माहिती समोर आली नसून मोबाईल बॅटरी स्फोटाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंता वाढली आहे.

First Published on: May 6, 2019 12:55 PM
Exit mobile version