राणेंना दणका, सिंधुदुर्गातील २ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

राणेंना दणका, सिंधुदुर्गातील २ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

राणेंना दणका, सिंधुदुर्गातील २ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेने नारायण राणे यांना सिंधुदुर्गात दणका दिला आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये २ नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं आहे. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात या नगरसेवक आणि सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा नसून तीच येड्यांची जत्रा असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गात भाजपकडून नारायण राणे यांना बळ दिल्यामुळे शिवसेनेला धोका निर्माण होईल असे सांगण्यात येत होते मात्र सिंधुदुर्गातील दोन नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे अनेकांचा दावा फोल ठरला आहे.

आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे की, खरतर जन आशीर्वाद यात्रा कोकणात निघाली आणि त्या यात्रेच्या निमित्तानेसुद्धा, तसेच दोन ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरुपात निवडणुका झाल्या होत्या या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनाने भगवा फडकावला आहे. त्याचबरोबर आज देवगड नगरपालिकेच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हर्षदा ठाकूर आणि विकास कोयंडे या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणेंना ताकद दिल्यामुळे शिवसेना कोकणात कमकुवत होईल असे सांगण्यात येत होते. विकास कोयंडे अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. असे लोकं शिवसेनेत का येत आहेत याचं आत्मपरिक्षण भाजपने केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

खरंतर हा नितेश राणेंना स्टंट म्हणायचं असेल तर म्हणून देत अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. आता दोन नगरसेवक स्वतःहून आले आहेत. खर तर नितेश राणे आणि त्यांचे वडिल नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला कसा प्रतिसाद मिळाला हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. ती जन आशीर्वाद यात्रा नसून येड्यांची जत्रा होती. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री यांना अपेक्षित असल्यासारखे कोकण शिवसेनामय करण्याचा आमचा निर्धार असेल असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

२ नगरसेवकांचा प्रवेश

भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात आयोजित केली होती. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला काही दिवस उलटताच भाजपच्या दोन नगरसेवक आणि सरपंचांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.

First Published on: September 2, 2021 8:12 PM
Exit mobile version