नगरमध्ये एकाचा मृत्यू, राज्यातील आकडा १ हजार ३८० वर

नगरमध्ये एकाचा मृत्यू, राज्यातील आकडा १ हजार ३८० वर

कोरोना व्हायरस

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ३८० इतकी असून नवी मुंबई आणि नगरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात पुणे, अकोला, बुलढाणा आणि रत्नागिरी या जिल्ह्यात २० नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अकोल्यात चार नवे रुग्ण

अकोल्यात चार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३ वर गेली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे आढळून आले आहे. आज सापडलेले हे चारही जण आधीच्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये एका साडेतीन महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. हे चारही रुग्ण बैजपुरा या चिंचोळ्या परिसरातील असून हा परिसर प्रशासनाने आधीच सील केला आहे.

नगरमध्ये तरुणाचा मृत्यू

नगर जिल्ह्यातील एका गतिमंद असलेल्या २७ वर्षाच्या तरुणाचा ससून रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गाने आज सकाळी मृत्यू झाला आहे. त्याला ५ एप्रिलला ससून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज त्याचा मृत्यू झाला आहे.

रिक्षा चालकाचा मृत्यू

पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. खारघर येथील एका रिक्षाचालकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, पनवेल महापालिका क्षेत्रात १७ आणि पनवेल ग्रामीण भागात चार, असे एकूण २१ कोरोनाचे रुग्ण आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! डॉक्टरच्या चुकीमुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू


 

First Published on: April 10, 2020 3:38 PM
Exit mobile version