आज पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे दोन तासांसाठी बंद राहणार

आज पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे दोन तासांसाठी बंद राहणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे

पुणेमुंबई एक्स्प्रेस हायवेने आज, गुरूवार, ९ मे रोजी प्रवास करणाऱ्या सर्व चालक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आज मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ५५/६०० ते ८८ वर (मुंबई वाहिनी) ओव्हरहेड गॅन्ट्री ( रस्त्यावरील लोखंडी कमान) बसवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे  दुपारी १२ ते २ वाजे दरम्यान हे काम होणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्गाची सुविधा 

दरम्यान, सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ८५/५०० या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. तर हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबईपुणे महामार्ग (एनएच) ने मुंबईकडे वळवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्‌ध केली असून गुरूवारी दुपारी १२ ते २ दरम्यान वाहनचालकांनी सहकार्य करावे किंवा आपल्या पुणे ते मुंबई प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: May 9, 2019 8:26 AM
Exit mobile version