कोल्हापूरात थंडीने घेतला दोघांची जीव

कोल्हापूरात थंडीने घेतला दोघांची जीव

प्रातिनिधिक फोटो

सध्या मुंबईसह राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे. मार्च महिन्यापासून उन्हाळ्याने त्रस्त असेलेल राज्यातील नागरिक आता थंडीमुळे सुखावले आहेत. साधारण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून हवेत अचावक गारवा जाणवू लागल्यामुळे राज्यभरातील लोक गुलाबी थंडीची मजा अनुभवत आहेत. मात्र, दुर्देवाने कोल्हापूरात हीच थंडी जीवघेणी ठरल्याचं चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपुरी इथल्या कोंबडी बाजार भागातील २ वृध्द व्यक्तींचा थंडीमुळे जीव गेला आहे. दोघांपैकी एका मृतकाचे नाव खंडेकराव दिनकरराव कारंडे (६१) असे असून, दुसऱ्या ईीसामचाी ओळख अद्याप पटलेली नाही. हे दोन्ही वृद्ध इसम फिरस्त असून रस्त्यांवर फिरुन अन्न मागण्याचं काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. एकीकडे राज्यातील अन्य शहरात नागरिक थंडीचा आनंद घेत असताना, कोल्हापूरात याच थंडीमुळे दोघांचा जीव जाणं ही दुर्देवी घटनाच म्हणावी लागेल. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर शहर आणि परिसरात थंडीने चांगलाच जोर धरला आहे.

मृत खंडेकराव दिनकरराव कारंडे

दरम्यान मृतक खंडेकराव कारंडे आणि त्यांच्यासोबतचा दुसरा इसम हे दोघंही, गेल्या महिनभरापासून लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरात वास्तव्याला होते. परिसरातील खाण्याच्या गाड्यांवर तसंच परिसरात येणाऱ्या लोकांकडून भीक मागून हे दोघं आपला उदरनिर्वाह चालवत होते. लोकांनी दिलेले कपडे आणि त्रोटक अंथरत परिसरातील दुकांनांच्या पायऱ्यांवर ते झोपत होते. परिसरातील विक्रेत्यांना आणि नित्याने येणाऱ्या लोकांना याबाबत माहिती होती. मात्र, रविवारी दुपारी बराचवेळ झाला तरी या दोघांच्या काहीच हालचाली जाणवत नसल्यामुळे परिसरातील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास केला आणि दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मृतांपैकी दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. याशिवाय दोघांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं कामही पोलीस करत आहेत.


वाचा: भूकंपाच्या भीतीने थंडीतही झोपतात घराबाहेर

 

First Published on: December 17, 2018 10:00 AM
Exit mobile version