धक्कादायक : देवळ्यात एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक

धक्कादायक : देवळ्यात एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक

देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे तालुक्यात बनावट मुद्रांक व मुद्रांकावर छेडछाड करून जमीन खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

देवळा तालुक्यात खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून एकाच क्रमांकाचा मुद्रांक हा दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे दिला गेल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ए 970408 हा मुद्रांक क्रमांक असलेला एकच मुद्रांक दोन व्यक्तींच्या नावे देऊन जमीन खरेदी-विक्री करण्यात आली आहे. अज्ञान असलेल्या व्यक्तींना यामुळे पुढील काळात खबरदारी घ्यावी लागणार आहे, तसेच या अगोदरही असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात असून बनावट मुद्रांक वापरून खरेदी-विक्री केली गेली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात संबंधित कार्यालय व त्यातील कर्मचार्‍यांचा देखील हात असण्याचीही शक्यता असल्याने जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कार्यवाहीची मागणी होत आहे.

First Published on: February 8, 2021 11:59 PM
Exit mobile version