शहरात एकाच दिवशी दोन आत्महत्या; काय आहेत? आत्महत्येची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपाय…

शहरात एकाच दिवशी दोन आत्महत्या; काय आहेत? आत्महत्येची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपाय…

नाशिक : शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून पुरुष व महिलांमध्ये गळफास व विष प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात रविवारी (दि.१३) एकाच दिवशी दोन जणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी सातपूर व गंगापूर पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सखाराम भाऊराव दिवे (वय ४५, रा. वासळी, ता. जि. नाशिक) व सोनाली भरत बेंडकुळे (वय १८, रा. मोतीवाला कॉलेजजवळ, धृवनगर, नाशिक) यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पहिल्या घटनेनुसार, विष पिवून युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सखाराम भाऊराव दिवे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम दिवे यांनी रविवारी (दि.१४) राहत्या घरी विष पिले. ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस नाईक भड करीत आहेत.

दुसर्‍या घटनेनुसार, सोनाली हिने राहत्या घरी विष पिवून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येची कारणे

आत्महत्येची लक्षणे

आत्महत्या करण्याची इच्छा असलेल्यांशी कसे बोलावे?

आपल्या समाजात आत्महत्येबद्दल अनेक समज आणि अफवा आहेत. या भ्रमांपैकी एक असाही आहे की, ज्याला आत्महत्या करायची आहे, त्याच्यासमोर जर याबाबत बोलले गेले तर त्याची आत्महत्या करण्याची इच्छा आणखी वाढते. जर तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर विश्वास ठेवा की, त्याच्याशी बोलणे खूप महत्वाचे आहे. चर्चा करण्यासाठी ठोस गोष्टींच्या आधारावर त्याच्याशी बोलणे देखील एक शहाणपणाचा निर्णय आहे. या व्यतिरिक्त, थेरपिस्ट किंवा आत्महत्या प्रतिबंध हॉटलाइनशी बोला. भविष्यातही तो त्याच्याशी संपर्कात राहील या निर्धाराने संभाषण संपले पाहिजे.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना खालील प्रश्न खूप मदत करू शकतात. जसे ?
First Published on: May 16, 2023 1:31 PM
Exit mobile version