Sindhudurg: कोरोनाशी लढण्यासाठी सिंधुदूर्ग सज्ज, उदय सामंतांनी घेतली आढावा बैठक

Sindhudurg:  कोरोनाशी लढण्यासाठी सिंधुदूर्ग सज्ज, उदय सामंतांनी घेतली आढावा बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही (Sindhudurg District )  सद्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी आठ ठिकाणी प्लांट उभारण्यात येत असून त्यातील 6 प्लांट तयार आहेत रिफलिंग प्लँट तयार आहे 13 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे तसेच 21 ड्युरा सिलेंडर,1374 जम्बो सिलेंडर उपलब्ध केलेले आहेत 984 बेड उपलब्ध असून 800 ऑक्सिजन बेड आहेत ग्रामपंचायत स्तरावरही बेड उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत 1380 बेड तयार हवेत परंतु आपल्याकडे 1900 बेड उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली त्यानंतर ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यात आतापर्यंत 96 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 74 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे आता 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलाचे लसीकरण सुरू केले असून 40 हजार मुलांना दहा दिवसांत लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 66 हजार 868 एवढी पुरेशी लसही उपलब्ध आहे 10 जानेवारी पासून 60 वर्षावरील नागरिकांना आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याची माहीती पालकमंत्री उदय सामंत यानी दिली.

जिल्ह्यात कोरोना वाढीचा पॉझिटिव्हीटी दर हा वाढला आहे त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून कठोर निर्बंध लावले जाणार आहेत हे निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तसेच आठवडा बाजार आणि जत्राच्या ठिकाण ची वाढती गर्दी लक्षात घेता बंद कराव्या लागतील त्यासाठी परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जाणार आहे सद्या रात्रीचा नाईट कर्फ्यु लागू आहे परंतु त्याचे पालन होत नसल्याने नियमांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी कडक भूमिका घ्यावी अशा सूचना प्रशासनला देण्यात आल्या आहेत. क्वारंटाईन बाबतचे अधिकार ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

भविष्यात लॉकडाऊनची गरज वाटल्यास व्यापारी, रिक्षा चालक, वाहन चालक सर्व व्यापारी संघटना, पत्रकार, दुकानदार व्यवसायिक यांच्याशी चर्चा करून लॉकडाऊन करण्यात येईल असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिहयातील शाळांबाबत बुधवारी निर्णय 

उद्या संध्याकाळपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नववी पर्यंत चे वर्ग बंद ठेवण्याबाबत व शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आपली जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक झाली असून या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शाळा बंद ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शाळा बंद ठेवावेत की नाही त्यावर पुन्हा एकदा उद्या चर्चा करून संध्याकाळपर्यंत निर्णय होणार आहे. नगरपंचायत निवडणूक प्रचारात प्रचारसभा घेऊ नये किंवा गर्दी करू नये यासाठी निवडणूक प्रचारापेक्षा मतदाराचे आयुष्य महत्वाचे आहे त्यामुळे निवडणूक प्रचार शांततेत करावा असे आवाहन केले.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात आज दिवसभरात १८, ४६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ७५ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

First Published on: January 4, 2022 9:39 PM
Exit mobile version