शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?; राज्यपाल-त्रिवेदींवर उदयनराजेंचा घणाघात

शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?; राज्यपाल-त्रिवेदींवर उदयनराजेंचा घणाघात

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भांत जे वक्तव्य केले त्यावरून सर्वत्र वादंग निर्माण झाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भांत खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले हे वाक्य जेव्हा मी राज्यपालांच्या तोंडून ऐकलं तेव्हा कक्षणभर मला काही समजलेच नाही. मग माझ्या मनात प्रश्न आला की राज्यपाल कोश्यारी यांनी जे वक्तव्य केले त्याला आधार काय? जेव्हा भारतावर मुघलांचे राज्य होते त्यावेळी देशभरातील अनेक राजे मुघलांना शरण गेले पण फक्त शिवाजी महाराजांनी जनतेला सन्मान मिळवून देण्यासाठी आणि जनतेवरचा अन्याय दूर कारण्यासाठी मुघलांना विरोध केला. जनतेच्या हिताचा विचार उराशी धरून शिवाजी महाराजांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले आणि राज्यपाल म्हणतात की शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले असं राज्यपाल म्हणतात.

जगभारत अनेक राजे होऊन गेले पण त्या सर्वांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये एकच फरक आहे की इतर जे राजे होऊन गेले त्यांनी स्वतःचे साम्राज्य वाढविले पण फक्त शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी लढा दिला. असं उदयनराजे भोसले म्हणाले. आधुनिक भारताची संकल्पना शिवाजी महाराजांनी त्या काळात मांडली होती. देशातील अनेक शूर वीरांचे स्फुर्तिस्थान शिवाजी महाराज होते. असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना उदयनराजे भोसले यांनी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला. त्रिवेदी यांच्यासंदर्भात बोलताना उदयनराजे म्हणाले, सुधांशू त्रिवेदी म्हणाले की शिवाजी महाराजांनी माफीनामा लिहून दिला त्यावर उदयनराजे भोसले म्हणाले, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? शिवाजी महाराजांबद्दल बोलताना लाज वाटत नाही का? कोणत्या आधारावर ही लोकं अशी वक्तव्य करतात? असं म्हणतात उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.


हे ही वाचा – प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केले ७२ तोळ्यांचे सोने, कारण माहितीय का?

First Published on: November 24, 2022 1:46 PM
Exit mobile version