राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले संतापले; म्हणाले…

राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले संतापले; म्हणाले…

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केले. यामुळे सर्वत्रच संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलणारे विकृत आहेत. विकृत लोकांना पक्षातून काढून टाकायला हवे. शरीराला गँगरीन झाल्यावर जसा शरीराचा भाग काढून टाकला जातो त्याचप्रमाणे कोश्यारी आणि त्रिवेदी यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे. असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भांत जे वक्तव्य केले त्यावरून उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. याच संदर्भात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी वाचन केले नसावे. असं विधान ते अनेकदा करतात. महाराजांबद्दल किंवा अनेक राष्ट्रीय हिरोंबद्दलही ते या याधीही बोलले आहेत. राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. त्या पदावर कोश्यारी आहेत जर का त्यांना ते पद सांभाळता येत नसेल तर अशा लोकांना त्या पदावरून बाजूला करणेच योग्य आहे असं म्हणत उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरून उदयनराजेंनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही उदयनराजे भोसले चांगलेच कडाडले, तो कोण कुठला थर्ड क्लास सुधांशू त्रिवेदी? असे विकृत लोक शिवाजी महाराजांविरुद्ध बरळत असतात. दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागायला लावा आणि पदावरून, पक्षातून काढून टाका अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करेन. त्यांना काढून टाकले नाही तर माझी पुढची भूमिका काय असेल ते मी तेव्हा सांगेन, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

भाजपने स्पष्टीकरण द्यावं – संभाजीराजे
सरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्यावरून भाजपला चांगलेच सुनावले आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. त्रिवेदी हा कसं बोलू शकतात. बरोबर असेल तर बरोबर म्हणून दाखवावे. चुकीचे असेल तर माफी मागायला लावावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.


हे ही वाचा – महाराष्ट्र गारठला! मुंबईतही तापमानाची घसरगुंडी; शाल, स्वेटर तयार ठेवा

First Published on: November 21, 2022 1:14 PM
Exit mobile version